अंतिम वर्षांच्या परीक्षा.. आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी?

128

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- कोरोना संकट काळात यूजीसी ने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर 2020 पर्यंत घेण्याच्या सूचना केल्यानंतर महाराष्ट्रात युवासेना सह देशभरातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी, विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवला आहे. आज याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. दरम्यान कोरोना संकटकाळात परीक्षा रद्द करून सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तसेच सरकार या निर्णयावर ठाम आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून अ‍ॅफिडेव्हिड सादर करण्यात आले आहे. आता न्यायालय यावर काय सुनावणी करणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान माहाराष्ट्रासह, दिल्ली, पंजाब सोबतच 13 राज्यांनी कोरोना संकटकाळामध्ये परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णय व्हावा अशी अपेक्षा विद्यार्थी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

*दखल न्यूज भारत*