ढोंगी बाबाने लावला …. भक्तांना कोट्यवधीचा रुपयांचा चुना

191

 

हर्ष साखरे उपसंपादक

मलकापूर :- अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुहा परिसरात एका मंदिराचा आधार घेत सामाजिक व धार्मिक कार्य करण्याच्या नावाखाली एका कथित बाबाने अनेक श्रध्दाळू लोकांकडून कोट्यवधी रूपयांच्या देणग्या तसेच ठेवी जमा केल्या . परंतु गेल्या चार दिवसापासून बाबा न सांगताच अचानक गायब झाल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे . तर काहींनी ४०-४५ लाखांच्या रकमा ठेव म्हणून दिल्याने त्यांची मात्र झोपच उडाली असल्याचे समजते . पोलिसात न जाता बाबांचा शोध घेण्यासाठी ते पोलिसांचे काम करत असल्याचे समजते . मुक्ताईनगर तालुक्यातील व श्रीक्षेत्र धुपेश्वर येथून हाकेच्या अंतरावरअसलेल्या पिंप्राळा गावात मुख्य रस्त्या नजीक गेल्या चार वर्षापूर्वी एक मंदिर उभारण्यात आले . त्या ठिकाणी गोशाळा सुध्दा उभारण्यात आली . त्याठिकाणी आलेल्या बाबाने त्या जागेवर धार्मिक स्थळ बांधण्याचा निश्चय केला होता . त्या माध्यमातून त्याने गेल्या चार वर्षात अनेक चांगली कामे केली . परिसरातील शेकडो एकर शेती ५० टक्के नफ्याने करून त्या ठिकाणची आलेली रक्कम सामाजिक धार्मिक कामासाठी वापरली . इतकेच नव्हे तर त्यासाठी काही श्रध्दाळू लोकांकडून ठेवी ठेवणे अथवा देणग्या देणे अशी पध्दत अवलंबिण्यात येत होती . काही महिलांनी स्वतःची मंगळसूत्रे सुध्दा गहाण ठेवून धार्मिक व सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात दिला . इतकेच नव्हेतर एका व्यक्तीने तब्बल ४५ लाख रूपयांची रक्कम त्या बाबाकडे ठेवलेली असल्याचे समजते .