Home महाराष्ट्र आदिवासी दिनानिमीत्त,”ईगल संस्थेकडून,गरजूंना किराना वस्तू भेट…

आदिवासी दिनानिमीत्त,”ईगल संस्थेकडून,गरजूंना किराना वस्तू भेट…

141

दिक्षा ललिता/रोशनी बैस
कार्यकारी संपादीका
शहापूर- ईगल संस्था मुंबई यांचे वतीने शहापूर तालुक्यातील मौजे नांदगाव कातकरी वस्ती मधील गरीब कुटुंबातील महिलांना आदिवासी दिनानिमीत्त किराणा वस्तूंचे जीवनावश्यक किट विनामूल्य वितरित करण्यात आले.
या संस्थेचे कार्यकारी संचालक व आदिवासी समाजदूत डाॅ. निलरतन शेंडे यांचे सौजन्याने व मार्गदर्शनाखाली नांदगाव व डोंगरीवाडी येथील आदीम जमातीचे महिलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.ईगल संस्थेचे पशुसंवर्धन विषयक सल्लागार डाॅ. दिलीप धानके यांचे उपस्थितीत सदरचे जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले. कोरोनाचे कठीण काळात आदीवासीचे रोजगार बुडाले असल्याने डोंगराएवढ्या दुखःवर ईगल संस्थेने एक छोटीसी फुंगर मारली आहे.परंतु लवकरच याच वाडीतील कातकरी महिलांना गरीब हटाव या उपक्रमाखाली शेळी गट वाटप केले जाणार आहेत.ही ईगल संस्था आदिवासी कातकरी कुटुंबातील स्थलांतर थांबविण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून या शहापूर तालुक्यात कार्यरत आहे. आतापर्यंत या संसाथेने किमान २००हून अधिक आदिवासी कुटुंबात रोजगाराची एक पणती पेटवली आहे. या वर्षभरात आणखी किमान पाचशे कुटुंबात स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नती साधण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत या संस्थेचे कार्यकारी संचालक डाॅ. निलरतन शेंडे यांनी सांगितले.या वाटप समारंभासाठी ईगल संस्थेचे कर्मचारी Sunil Dangle Kalpesh More Vishal Ghanghav व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील धानके, सेवा सोसायटी संचालक हरेष धानके,किसन धानके,भगवान धानके व संदीप धानके इत्यादी उपस्थित होते.या उपक्रमाबद्दल आदिवासी महीलांनी ईगल संस्थेचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Previous articleशब्दांच्या पुष्पवृष्टीत रंगला ‘पाऊस’ प्रकाशन सोहळा.. — मराठीशी नातं जोडण्याचा स्तुत्य उपक्रम: आर जे मिलिंद पाटील..
Next articleम.गांधी विद्यालयाचे संस्थापक किशोर वनमाळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन