स्वतःचा जिव धोक्यात घालुन 27 वर्षीय युवकाने वाचविले बैलाचे प्राण

554

युवराज डोंगरे/खल्लार:-स्वतःचा जिव धोक्यात घालून पुरात वाहून येत असलेल्या मुक्या जनावरास खल्लार येथील 27 वर्षीय युवकाने नदीच्या पुरात उडी घेऊन वाचविले
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु असुन या पावसाने आज दि 18 ऑक्टोबरला चंद्रभागा नदीला पूर आला या पुरात सकाळी 10 वाजताच्या सुमारास एक बैल वाहून येत असल्याचे खल्लार येथील राजकुमार धारपवार या 27 वर्षीय युवकास दिसले बैल दिसताच त्याने बैलाचा जिव वाचविण्याकरीता खल्लारच्या पुलावरून उडी मारली व आपला जिव धोक्यात घालुन मुक जनावर असलेल्या बैलाचे प्राण वाचविले त्याच्या या धाडसाबद्दल राजकुमार धारपवार याचे कौतुक केल्या जात आहे