आरमोरी तालुकामध्ये होणारी अवैध दारूविक्री, व वैद्यकीय , महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई- पासची सक्ती शासनाने कमी करावी यासाठी आरमोरी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पालकमंत्री याना निवेदन सादर

0
134

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी-
सध्या जगात कोविड-19 महामारी सुरू आहे. आपल्याही देशात , राज्यात, जिल्हयात ह्या महामारीपासून बचावाकरिता उपाययोजना म्हणून शासनाने विविध निर्णय घेतलेले आहेत . आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर जाणे-येणे करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आरमोरीला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आरमोरी शहरात त्यांच्या शेतातील भाजीपाला,दूध, मच्छी ईत्यादी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणून सुध्दा विकता येत नाही. तसेच आरमोरी तालुक्यातील लोकांना चंद्रपुर जिल्हात शेतावर तसेच नागपूर, ब्रम्हपुरी आपल्या कामासाठी जायचे असल्यास ई-पास काढण्याची सक्ती केलेली आहे .वैद्यकीय कामाकरीता जसे प्रसूती, अपघात,व आकस्मित सेवेच्या वेळीसूध्हा ई-पासची मागणी केली जाते. इतर पूर्वनियोजित कामासाठी ई-पास घेता येईल पण आकस्मित कामासाठी ई-पास ची मागणी बरोबर नाही. त्याकरिता टोल नाक्यावर आपल्या कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यास आकस्मित कामासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी परवानगी देण्याचे अधिकार देण्यात यावे . तसेच बाजूच्या शेतकऱ्यांना शेतमाल विकन्यासाठी येऊ देण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच सगळीकडे नाकाबंदी असतांना सुध्दा आरमोरी शहरात सर्व अवैध धंदे जोमात सुरू आहेत जसे दारू विक्री, तम्बाकू विक्री ,सट्टा-पट्टी, अवैध रेती तस्करी व अवाढव्य भावाने त्या रेतीची विक्री तालुक्यात सुरू आहे , शहरात एका फोन वर पाहिजे तिथे दारूचा पुरवठा सुरू आहे, हे सर्व बंद करण्यात यावे असे विविध पक्षीयांची बैठक घेऊन विविध पक्षीय निवेदन मा. पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले.
किशोर वनमाळी, दिलीप मोटवानी, डॉ. महेश कोपूलवार ,अमोल मारकवार, हंसराज बोदेले, महेंद्र शेंडे, अमीन लालानी, तेजेश मडावी उपस्थित होते.