क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना रत्नागिरी आणि जीवनदान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न.

0
105

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना रत्नागिरी आणि जीवनदान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज ओम साई मित्र मंडळ सभागृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्राचीन कोकण चे सरदेसाई साहेब आणि सुधीर शेठ पटवर्धन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. आजच्या रक्तदान शिबिरात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यांचा संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याच शिबिराच्या कार्यक्रमात क्रांतिकारी ड्रायव्हर संघटना रत्नागिरीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना राजरत्न प्रतिष्ठानचे श्री सचिन शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी क्रांतिकारी ड्रायव्हर संघटना रत्नागिरीचे सर्व सभासद आणि पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली. कोरोनाच्या महामारीत रक्तदान शिबिरामुळे अनेकांना मदत होणार आहे.
विकास साखळकर कोकण संपर्कप्रमुख क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*दखल न्यूज भारत*