रत्नागिरीत २४ तासात ६५ नवे रुग्ण, एकूण २२१३ जिल्ह्यात आणखी ५ कोरोना बळी

0
122

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये ६५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२१३ झाली आहे. दरम्यान १० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४८९ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय ८, कळबणी, खेडमधील १ आणि कामथे, चिपळूण येथील १ रुग्ण आहे.
पॉझिटिव्ह मिळालेले. रुग्ण. रत्नागिरी – ४, कामथे – ४४, लांजा – १, गुहागर – ४, दापोली – ५, ॲन्टीजेन टेस्ट – ७ रत्नागिरीत आज ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. दापोली येथील एका ४३ वर्ष वयाच्या व्यक्तीचा अहवाल ॲन्टीजने टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला कळबणी येथे दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा मृत्यु झाला. तसेच दापोली येथील ७० वर्षीय महिलेचा देखील मृत्यु झाला आहे. झरीरोड, चिपळूण येथील ६४ वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच राजिवडा, रत्नागिरी येथील ६४ वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. मारुती मंदीर, रत्नागिरी येथील ४४ वर्षीय रुग्णाचा कोल्हापूर येथे उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ७८ झाली आहे.

*दखल न्यूज भारत*