बसपाची महाराष्ट्र राज्यात संवाद यात्रा,उभारी की संजीवनी? — महाराष्ट्र राज्याचे प्रभारी सुरेश रैना,प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांचा कार्यकर्त्यांसी थेट संवाद..

266

 

संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

बहुजन समाज पार्टी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती राजश्री शाहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारत देशातील अनेक संत-महापुरुषांचा सामुहिक महा विचारग्रंथ.बसपा हा असा जागरूक व सतर्क महाविचार ग्रंथ आहे,”की,तो वैचारिक ग्रंथ देशातील तमाम शोषीत-पिडित-अन्याय-अत्याचारग्रस्त व अधिकारविहिन समाज घटकातील बहुजन नागरिकांना सकारात्मक विचारसरणीच्या माध्यमातून नेहमी अधिकार आणि हक्काची,शोषणाची आणि पिडितेची,अन्याय आणि अत्याचाराची जाणीव करून देतो.

तद्वतच राजसत्ता म्हणजे काय? आणि राजसत्ता हस्तगत करण्याचे फायदे काय? या संबंधाने सखोल असी माहिती बहुजन समाजातील नागरिकांना सांगतो आहे.मात्र,बसपा पार्टीत काम करणे म्हणजे सर्व प्रकारची कसरतच असते!बसपाची विचारधारा बहुजन समाजाला समजावून सांगणे साधी बाब नाही.जो व्यक्ती वारंवार अपमान सहन करण्याची शक्ती अंगिकारतो व चारित्र्याची हानी मनावर घेत नाही,”तोच,व्यक्ती बसपा मध्ये टिकाव धरू शकतो,बसपा अंतर्गत कार्य करु शकतो,हेही तितकेच खरे आहे.

बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते श्रमातंर्गत रक्ताचे पाणी करून सत्य तेच देशातील नागरिकांना सांगतात.पण,रुढीपरंपरावादी विचारसरणीत अडकलेले समाज मन त्यांचे ऐकेलच असे नाही तथा बसपा पार्टीसी जुडेलच असे सुध्दा नाही.याला कारण म्हणजे बसपा प्रलोभने देणारी पार्टी नाही,खोटे बोलून राजसत्ता हस्तगत करणारी पार्टी नाही,देशातील नागरिकांना भ्रमीष्ट करणारी पार्टी नाही किंवा देशातील नागरिकांसी बेईमानी करणारी पार्टी नाही.

भारत देशातील तमाम नागरिकांच्या सुख-समृध्दीसाठी बसपाचे कार्यकर्तागण व पदाधिकारीगण वेळ देतात,खुप श्रम घेतात,घाम गाळून कमावलेले रुपये चळवळीच्या उभारणी साठी नेहमी देतात,कार्यक्रमान्वये जनहितार्थ संघर्ष सातत्याने करतात.हे एवढे कशासाठी ते करतात?”तर,भारत देशातील सर्व नागरिकांच्या समृद्धीसाठी,उन्नतीसाठी,प्रगतीसाठी,शांतीसाठी,सदभावनेसाठी,सर्वांच्या अधिकार-हक्कासाठी,सर्वांना सत्तेत व प्रशासनात समान वाटा मिळावा यासाठी,जनहितार्थ कार्य करुन जागतिक पातळीवर देशाला मानसन्मान निर्विवादपणे मिळवून देण्यासाठी,सर्वांच्या हिताचा वैचारिक असा समृध्द देश बनविण्यासाठी,आणि अनेक प्रकारचे हित…

जनहितार्थ जबाबदारीने कार्य करण्याची कार्यपद्धत योग्य वैचारिक त्यागात असते व हा चारित्र्यवान वैचारिक त्याग निष्कलंकीत असतो,या संबंधांची परिभाषा भारत देशातील नागरिक धिम्या गतीने म्हणजे हळूहळू समजून घेत आहेत.योग्य वैचारिक त्यागाला हळूहळू समजून घेण्याच्या कार्यप्रणाली मुळेच भारत देशातील नागरिक हे त्यांचे हित जपणाऱ्या राजकीय संघटनेकडे व सामाजिक संघटनेकडे दुर्लक्ष करतात असे पुढे आले आहे,म्हणजेच स्वतःच स्वतःचे नुकसान करतात असे म्हणण्यास हरकत नाही.

महाराष्ट्र राज्यात बसपाची संवाद यात्रा,बसपाचे राज्य प्रभारी सुरेश रैना व प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजणे,यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.ही संवाद यात्रा बऱ्याच वर्षाच्या कालावधी नंतरची आहे.संवाद यात्रा साध्य काय करणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे.संवाद यात्रा पदाधिकाऱ्यांना कार्यक्षम उर्जा देणार,वैचारिक प्रेरणा देणार,जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना एकसंघ करण्यास प्रयत्न करणार,संघटन मजबूत करणारी दिशा घेणार,समाज प्रबोधनातंर्गत महाराष्ट्र राज्यात बसपाची ताकद वाढवणार,येवढे मात्र निश्चित.

बसपाचे त्यागमय व संघर्षमय पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाराष्ट्र राज्यात कशा प्रकारे बसपाला उभारी देणार व संजीवनी देणार हे त्यांच्या संवेदनशील कर्तृत्वावर अवलंबून असणार आहे.परंतू कठीण समयी बसपा महाराष्ट्र राज्यात संवाद यात्रा काढतो,”हाच,बसपा प्रदेश प्रभारी सुरेश रैना,बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजणे आणि तमाम बसपा पदाधिकारीगण व कार्यकर्तागण यांची,प्रभावी आणि परिणामकारक कार्यपद्धत आहे,हे समजून घ्यायला हरकत नाही.