डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशीक्षण संस्था (बार्टि) पूणे व सम्यक जागृत महीला समीती यांच्या संयूक्त विद्यमाने दिक्षाभूमी देसाईगंज येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा….

228

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

देसाईगंज :- डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन न प्रशीक्षण संस्था (बार्टि) पूणे च्या समतादूत वंदना दशरथ धोंगडे ता. देसाईगंज व सम्यक जाग्रूत महीला समीती दिक्षाभुमी देसाईगंज यांच्या संयूक्त विदयमाने दिक्षाभूमी देसाईगंज येथे भन्ते प्रज्ञारत्न, भन्ते महानाम यांच्या हस्ते सकाळी 9:30 वाजता धम्मध्वजाचे व नीळया ध्वजाचे ध्वजारोहन करून दोन्ही ध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच धम्म्मचक्र अनूवर्तन दिनाचे औचीत्य साधून संध्याकाळी 6:00 वाजता भन्ते प्रज्ञारत्न, भन्तेसोण, भन्ते महानाम यांनी सर्व मान्यवर व ऊपासक ऊपासकांना पुजा, वंदना, धम्मदेसना देऊन धम्मचक्क अनूवर्तन दिनाचे महत्व पटवून सांगीतले.

या कार्यक्रमाला प्रमूख मार्गदर्शक म्हणून मा.ईंजीनीयर विजय मेश्राम सर, चंदूजी राऊत, राजरतन मेश्राम व हरीष मोटवाणी ऊपस्थीत होते. तर सत्कारमूर्ती म्हणून डाँ.भगवान मांडवकर, ज्योती मांडवकर, प्रीयंका मांडवकर ऊपस्थीत होते.

डाँ.भगवान मांडवकर हे अतीशय कर्तव्यदक्ष, प्रामाणीक, नैतीकता जपणारे, अनमोल व निस्वार्थपणे रोग्यांची सेवा करणारे, एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या गूणांची व निस्वार्थ सवेविषयी कूतज्ञता व्यक्त करून समतादूत वंदना दशरथ धोंगडे (बार्टी)पूणे यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अंगीकारून भदन्त प्रज्ञारत्न, ईजी.वीजय मेश्राम, सूमनबाई धोंगडे यांच्या हस्ते शाँल व भारतीय संवीधानाचे पूस्तक व संवीधान ऊद्देशीका देऊन मान्यवरांच्या ऊपस्थीतीत त्यांचा सत्कार केला.

तसेच प्रीयंका मांडवकर हीला दहावीमध्ये 86%,बारावीमध्ये 77% गूण प्राप्त म्हणून तीला स्पर्धा परीक्षेत प्रेरणा मीळावी म्हणून mpsc चे व बूध्द आणी त्यांचा धम्म पूस्तक दान देऊन सत्कार करण्यात आला. यांच्या यशप्राप्तीमध्ये ज्योती मांडवकर यांचाही सींहाचा वाटा आहे म्हणून त्यांना साडी देऊन सत्कार करण्यात आला.

इंजी. विजय मेश्राम सर व ईतर मान्यवरांनी धम्मचक्क अनूवर्तन दिन व बाबासाहेबाच्या प्रेरणादायी विचारांवर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक शँमला राऊत, सूत्रसंचालन जयश्री लांजेवार यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन वंदना धोंगडे यांनी केले. याप्रकारे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला.