वैरागड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध चौकात पंचशील ध्वजारोहण.

195

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – देशात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात सजरा केल्या जात आहे. वैरागड येथेही विविध चौकात मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण, महामानवांच्या प्रतिमेस पुष्पमाला द्वीप प्रज्वलन करून पंचशील, अष्ठगाठा घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहल्ला) येथील विहारासमोरील झेंड्याचे समिती अध्यक्ष यशवंत बोदेले यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तसेच बाजार टोली येथील पंचशील चौक येथील सोनाली शेंडे, रेखा बरडे यांच्या अध्यक्षखाली सुरय्या सांगोळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण, येथील दिक्षाभूमी येथे नरहरी भाणारकर यांच्या अध्यक्षतेखाली दत्ता खोब्रागडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण, बसस्थानक जवळील शिदार्थ चौक येथे विठ्ठल सोरते यांच्या अध्यक्षतेखाली लीलाधर लाडे आणि पवन सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत यादव सहारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण,
बसस्थानाक येथे असलेल्या अशोक चौक येथे जिवा तागडे यांच्या अध्यक्षतेखाली रमेश मेश्राम यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे गावातून प्रभातफेरी काढण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मोजक्याच नागरिकांत पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस गावातील आरमोरी पंचायत समिती उप सभापती विनोद बावनकर, माजी जिल्हा परिषद समाज कल्याणअधिकारी विश्वनाथ भोवते, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, ग्राम पंचायत सदस्य सत्यदास आत्राम, विलास तागडे, रेखा भैसारे तसेच गावातील नागरिक आणि बौद्ध बांधव उपस्थित होते.