महिला रुग्णालय आता कोरोना रुग्णालय पालकमंत्री ॲङ परब यांच्या हस्ते इ लोकार्पण

136

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : जिल्हयात नवी सुविधा निर्माण झाल्याने कोरोना मुक्त जिल्हा करण्याच्या कामाला अधिक गती प्राप्त होईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी महिला रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या अद्ययावत कोव्हीड रुग्णालयाच्या ई-लोकार्पण प्रसंगी केले तसेच ना उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन फीत कापून लोकार्पण केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून तर खासदार विनायक राऊत यांची ऑनलाईन प्रमुख उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने तसेच आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदिंची या कार्यक्रमास उपस्थिती होती. जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन, आरोग्य सेवा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिमान पध्दतीने ही सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
ना उदय सामंत यांनी प्रशासनाच्या मागे शासन भक्कम उभे आहे असा विस्वास दिला. या रुग्णालयात 100 खाटांसह 24 बेडचे आयसीयू असणार आहे. सोबतच या 100 पैकी 66 खाटांना पाईपद्वारे ऑक्सीजन पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी एक व्हीआयपी वार्ड देखील आहे.
कोरोना योध्दे दिवंगत डॉ. दिलीप मोरे यांच्या स्मृत्यर्थ येथे एक स्वतंत्र वार्ड सुरु करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रुग्णालय इमारतीस भेट देवून फीत कापून याचे उद्घाटन केले. सोबत आ राजन साळवी हेही उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते या रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाकर, जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांतधिकारी डॉ. विकास सुर्यंवशी आदि मान्यवर उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*