लिप क्रिंकर या अज्ञात रोगाने थैमान घातलेल्या शेतकऱ्यांच्या मुंग,उडिद पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी– अँड.रविंद्र पोटे

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

खरीप हंगाम उभारणीसाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे मुंग व उडीद यांचे वर अकोला जिल्ह्यात लिप क्रिंकर (बेंडका) या अज्ञात रोगाने थैमान घातले आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दिवसात मिळणारे नगदी पीक नेस्तनाबूत झाले, आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत .त्यावरुन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अकोला जिल्हयातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली असता हा वायरल अटॅक आहे असे निदान त्यानी वणी वारुळा येथे भेट दिली असता सांगितले. सदर या नगदी पिकांचे विमे शेतकऱ्यांनी काढले असतील त्यांनी विमा कंपनी कडे तक्रारी कराव्यात असे मत अँड.रविंद्र पोटे यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने वृत्तपत्रात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पंचनामे झाल्याशिवाय शेतातील मुंग व उडीद पिके मोडू नये व उपळून टाकू नये परंतु काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मुंग व उडीद पिके मोडू टाकली आहेत.या अज्ञात रोगाने थैमान घातले असताना शासनस्तरावर याची दखल घेतली जावी यासाठी अँड रविंद्र पोटे यांनी आमदार अमोल मिटकरी यांना निवेदन देवून शेतकऱ्यांची व्यथा शासनस्तरावर मांडावी . तसेच कृषी विभागाने जिल्ह्यातील मुंग व उडीद पिकांचा सर्वे करून तात्काळ विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरी ४०ते५०हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना पुढिल मशागतीसाठी व पिक उभारणीसाठी सोईस्कर होईल व शेतकऱ्यांच्या कौटुंबिक उदारनिर्वाह होईल अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री पालक मंत्री आमदार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.