Home अकोला शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून अकोट येथे वीज बिलाची...

शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून अकोट येथे वीज बिलाची होळी

143

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

शेतीला मिळत असलेल्या उणे सबसिडी च्या पाश्वभूमीवर कर कर्ज नही देगे बिजली का बिल भी नही देगे. या घोषणेचा अनुषंगाने आज नऊ आॅगस्ट क्रांती दिनी अकोट महावितरण कंपनी समोर वीज बिलाची होळी करण्यात आली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार कोरोना संक्रमण काळात केंद्र सरकार ने लॉक डाऊन ची कठोर अंबल बजावणी केली. कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. पण जनतेला त्याचा आर्थिक भुदंड खूप बसला. त्यातही मध्यम वर्ग व गरिबांना रोजगार उपलब्ध न झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यावर महावितरणने लॉक डाऊन च्या काळातील तीन महिन्याचे बिल एकत्र पाठवले.जे काही हजारो रुपयात आहे ते संपूर्ण माफ करण्याची मागणी आंदोलकांनी केली कृषीपंपाचे वीज बिल संपवा, विदर्भाला विजेच्या प्रदुशनातुन मुक्त करा अशी मागणी केली या वेळी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित पाटील बाहाळे,शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख (माहिती व तंत्रज्ञान आघाडी) लक्ष्मीकांत कौठकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोट विद्युत महावितरण गेट समोर आंदोलन करण्यात आले.

Previous articleमाळी समाज संघटना धानोरा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
Next articleलिप क्रिंकर या अज्ञात रोगाने थैमान घातलेल्या शेतकऱ्यांच्या मुंग,उडिद पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी– अँड.रविंद्र पोटे