माळी समाज संघटना धानोरा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

156

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका माळी समाज संघटना यांच्या वतीने धानोरा तालुक्यामधील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माळी समाज सभागृह धानोरा येथे घेण्यात आला व पुढील यशस्वी जीवनाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुकाजी भेंडारे अध्यक्ष तालुका माळी समाज संघटना धानोरा हे होते, प्रमुख अतिथी मा. विनोदभाऊ लेनगुरे जि. प. सदस्य गडचिरोली, सोपानदेव मशाखेञी, अशोक मांदाडे, राखडे महाराज, नेवाजी गुरनुले, देवनाथजी मशाखेञी, किसनराव कुमरे, विश्वनाथ धुळसे, अजितभाई कुरेशी, मीराबाई मोहुर्ले, ताराबाई कुनघाडकर, जानकुबाई हलामी, सोमाजी गुरनुले, दिंगाबर मोहुर्ले, नरेंद्र निकोडे, पुंडलिक गावतुरे आदि उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन भास्कर सोनुले यांनी केले प्रास्ताविक प्रशांत निकेसर तर आभार प्रदर्शन अमोल मांदाळे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सदाशिव सहारे मारोती मोहुर्ले, राकेश सहारे, मयुर गावतुरे, रोशन सहारे यांनी प्रयत्न केले