राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या तर्फे नागभीड तालुक्यातील 16 वर्षीय युवतीवरिल बलात्कार प्रकरणी जाहीर निषेध.

342

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली जिल्हा आरमोरी विधानसभा क्षेत्र राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी अारमोरी यांच्यातर्फे 16 वर्षीय मुलीवरती झालेल्या बलात्कार प्रकरणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या कसारला गावातील घटना असून सदर युवतीवरती मागील दोन दिवसांपूर्वी बलात्कार झाला व त्यानंतर पीडीत युवतीने विहिरीमध्ये उडी घेऊनआत्महत्या केली असून दि. ९ ऑगस्ट रोजी तिचा मुतदेह विहिरीमध्ये मिळाल्याने प्रकरण उघडकीस आला तथा तीने लिहिलेल्या आत्महत्येच्या पुर्वीची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे आरोपी युवकांना अटक करण्यात आली त्या युवकांना कठोर शिक्षा देण्यात यावी असे मत राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ आरमोरी विधानसभा सघटक, तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी अारमोरी तालुका अध्यक्ष मा. विकेश नैताम यांनी व्यक्त केले आहे.