बहुजन ब्रिगेड महासंघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी मा. श्री .विठ्ठल श्रीपती जाधव यांची निवड करण्यात आली.

119

 

नीरा नरसिंहपूर पूर दिनांक 9 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार ,

बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची आज रोजी माळीनगर ता. माळशिरस  येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये हा निवडीचा निर्णय घेऊन त्यांची पदनियुक्ती तसेच पदभार देण्यात आला.

यावेळी बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष /संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संदिपजी मोहिते साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री. गणेशभाऊ साठे, बहुजन ब्रिगेड महासंघाचे सचिव मा.श्री.मोतीरामजी कोरे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रियाजभाई मुलाणी साहेब, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा. श्री. पांडुरंग लोखंडे उर्फ तात्यासाहेब,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा श्री अजिनाथ मदने, माळशिरस ता अध्यक्ष मा श्री नागेश ठोंबरे, माळशिरस ता सचिव मा श्री ऋषिकेश देशमाने, इत्यादी पदाधिकारी आणी समस्त जाधव परिवार उपस्थित होते.

त्याप्रसंगी नवनिर्वाचित सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा श्री  विठ्ठल जाधव साहेब म्हणाले की, फुले -शाहु -आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करुन अन्याया विरुध्द आवाज उठवुन सर्व बहुजनांच्या हक्कांसाठी काम करीन असे ठामपणे मत व्यक्त केले.

सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी निवडीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोरोना विषाणू संसर्ग च्या पार्श्वभूमीवर काही निवडक पदाधिकारी यांच्या उपस्थितीतच  शासनाच्या आदेशाचे पालन करून ही बैठक संपन्न करण्यात आली.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160