नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा च्या सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणीचे गठन

 

ऋगवेद येवले
तालुका प्रतिनिधि

नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा जिल्हास्तरिय सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणिचे गठन समस्त पदाधीकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्तिथित श्री गंगोत्री पिरॅमिड ध्यान मंदिर व ग्लोबल हिलिंग सेंटर, सेलोटी/पोहरा तालुका लाखनी येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व सभेचे उद्घाटक शरदराव उरकूडे तसेच सभेचे अध्यक्ष जेष्ठ मार्गदर्शक मंगलजी फुलबांधे यांच्या हस्ते सर्व तालुका व शहर/सर्कल पदाधीकारी यांच्या उपस्थितीत संत श्री सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सभेचे संचालन श्री रवी लांजेवार यांनी केले. मुख्य मार्गदर्शनात शरदराव उरकूडे यांनी युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन केले व संघटनेची नियमावली पदाधीकारी यांच्या मागील कार्याचा आढावा घेत सर्वानुमते नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणिचे गठन करून
अध्यक्षपदी रवी लांजेवार, सचिव सचिन फुलबांधे, कोशाध्यक्ष आदीनाथ सूर्यवंशी, उपाध्यक्ष रामेश्वर मादेश्वार, कार्याध्यक्ष हिमांशु फुलबांधे, उपाध्यक्ष सत्यवान मेश्राम, सहसचिव डिगाम्बर सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कोरोणा संक्रमण रोकथाम विषयक लॉकडाउन च्या काळात सलुण व्यवसायिक बाँधवाँचि आर्थिक हलाकी व त्यावर युवकाँचे निष्कर्ष,निकष व उपाय विषयक चर्चा करीत प्रशासकीय नियमांचे पालन करीत सोशियल डिस्टन्सिन्ग पाळत सनेटायझर, डेटॉल, स्वच्छ कापड व ग्राहकांची नाव व मोबाईल नम्बर नोंद ठेवून कार्य करण्यावर प्रकाश टाकण्यात आले. तद्नंतर नवनीयुक्त व पुनर्गठित पदाधीकारी यांचे मनोगत व शपतविधि घेण्यात आले व सभेच्या अध्यक्षांनी युवकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद प्रदान करून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा प्रदान केले.सदर सभेत सोशियल डिस्टन्सिन्ग चे पालन करण्यात आले.युवकांना जोड़धंदा करण्यास मार्गदर्शन पर एका लघु सेमिनार द्वारे प्रेरित करण्यात आले. सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रीयभाव समर्पण केले. आभार प्रदर्शन श्री तारेश मौदेकर यांनी केले व सभासुचारु पणे सम्पन्न झाली असे जाहीर केले. शेवटी अल्पोपहाराने सभेची सांगता झाली. सभेला सर्वश्री श्रीयुद आदीनाथ सूर्यवंशी, अजय इलुरकर, सुधीर उरकूडे, प्रशांत अतकरे, संतोष लांजेवार भंडारा, डिगाम्बर सूर्यवंशी, जगदीश पोवणकर, सचिन सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, दामराज सूर्यवंशी, संदीप लांजेवार,नरेंद्र पोवणकर, भोजराज पोवनकर साकोली, सचिन उरकूडे, अभय उमरकर, सचिन अतकरी मोहाडी, नँदकुमार दाणे, सचिन उरकूडे, जितेंद्र उरकूडे, अमोल फुलबांधे, नितीन फुलबांधे लाखांदुर, लोकेश चावके, रवी नागमोते, हिमांशु फुलबांधे तुमसर, संजय फुलबांधे, तुषार नैनपूरकर, प्रमोद लाखेकर, गोपाल कावळे, ईश्वर क्षीरसागर, विष्णु उरकूडे, योगेश क्षीरसागर, अमित शेंडे, रेवनाथ सूर्यवंशी पवनी, निलेश मेश्राम, सुधाकर मेश्राम, एकलव्य पोवणकर, राकेश कावळे, गणेश सूर्यवंशी, चंदु कावळे, सागर लांजेवार, राकेश लांजेवार, हरिश लांजेवार लाखनी यांचे सहकार्य व उपस्थिति लाभली.