देवरीत महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद

124

 

जिल्हा प्रतिनिधी रुपेश कुमार टेभुर्णिकर दखल न्युज गोंदिया/देवरी

शहरातील काही भाजप कार्यकर्त्यांकुन देवरी बंदचा विरोध…

*देवरी:-*
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. त्याच घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. देवरीमध्ये महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीच्या नेतृत्वात काँग्रेस , राका आणि शिवसेना पक्षासह अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

देवरी शहरातील सर्व व्यापार , छोटे , मोठे दुकाने , बंद असल्याचे बघावयास मिळाले. तर काही भाजप कार्यकर्त्यां तर्फे देवरी शहरात बंदला विरोधही दर्शविन्यात आला. महाविकास आघाडी द्वारे रॅली काढून सदर घटनेचा निषेध करण्यात आला. सदर रॅली मध्ये आमदार सहषराम कोरोटे, रमेश ताराम, संदीप भाटिया , सीके बिसेन, सुनिल मिश्रा, यांच्या सह सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.