पारशिवणी साजरा झाला रानभाज्या व पंरपरागत फळाचा महोत्सव

104

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रीतानिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी :-(ता प्र)आज दिनांक 9/8/2020 रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तालुका कृषि अधिकारी कार्यालय पारशिवणी व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाज्या महोत्सव व परंपरागत फळाचा महोत्सव चे आयोजन तकीया मारोती देवस्थान पारशिवणी येथे करण्यात आले होते.

या महोत्सवाचे उदघाटन मा.सभापती सौ.मीनाताई प्रफुलजी कावळे व मा.उपसभापती श्री.चेतन शंकरजी देशमुख यांनी केले.
सदर महोत्सवाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी डॉ.ए.टी.गच्चे यांनी केले रानभाज्या महोत्सव आयोजनाचे प्रमुख उद्दिष्ट दुर्गमअश्या औषधीगुण युक्त रानभाज्याचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे असे होते..
या महोत्सवात पारशिवणी आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आपल्या भागात उपलब्ध असलेल्या जसे काटवल,गूळवेल,बांबू आस्ते,अळू,अंबाडी,बांबू मशरूम,घोळ,भुईआवळा इ. रानभाज्या शहरी भागातील लोकांना उपलब्ध करून दिल्या.तसेच रानभाज्या व त्यांचे औषधी गुणधर्म यांच्या संबंधात माहिती सुद्धा उपस्थितांना कृषी अधिकारी डॉक्टर ए हीं गच्चा यांनी उपस्थितीना दिली.महोत्सवाचे सूत्र संचालन श्री.ए.एन.देशमुख यांनी केले.
या महोत्सवास शेतकरी बांधवांनी तसेच शहरी भागातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
महोत्सवाचे आयोजन सफलार्थ करण्यात मंडळ कृषि अधिकारी कन्हान श्री.जी.बी वाघ ,मंडळ कृषि अधिकारी पारशिवणी श्री.एस.आर.शेंडे,कृषि पर्यवेक्षक श्री.एस.आर.ठाकरे,आत्मा व्यवस्थापक श्री.श्रीराव,श्री.पी.जी.सोमकुवर तसेच कृषी विभागाचे कर्मचारी श्री.आर.डी सोरमारे,श्री एस.वाय.बांबल,कु.ए.डी.संकपाळ,कु.आर.वाय.दटके,कु.व्ही.एच.ढंगारे,कु.एस.टी.राठोड,श्री.ए.जे.झोड,श्री.जे.के.शेख,श्री.व्ही.एच साठे,श्री.एस.एन.भोसले,श्री.व्ही.डी.देशमुख,श्री.ए.व्ही.ढोले यांनी परिश्रम घेतले..