घनसावंगी येथे रानभाज्या महोत्सव संपन्न

0
93

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी घनसावंगी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती कल्याणराव सपाटे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती भागवतराव रक्ताटे, कृषिभुषण मदनराव वाडेकर, पंचायत समिती सदस्य भास्कर गाढवे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आणलेल्या विविध रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले. रानभाज्यांचे आहारामधील महत्व व त्यांची ओळख याबद्दल तालुका कृषी अधिकारी श्री राम रोडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच टी.पी.माहोरे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना मार्गदर्शन करून आदिवासी दिनांची माहिती दिली. यावेळी सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सर्व कृषी सहाय्यक व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक मुरलीधर गाढवे साहेब यांनी केले. यावेळी तालुक्यातील सर्व कृषी मित्र उपस्थित होते