Home यवतमाळ जागतिक आदिवासी दिनानिमित्य कृषी विभाग व आत्मा कडून रानभाजी महोत्सव संपन्न

जागतिक आदिवासी दिनानिमित्य कृषी विभाग व आत्मा कडून रानभाजी महोत्सव संपन्न

175

 

वणी : परशुराम पोटे

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय वणी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वणी यांचे तर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून *रानभाजी महोत्सव* प्रदर्शन व विक्री चे आयोजन 9 ऑगस्ट 2020 रोजी वणी येथील कल्यान मंडपम सभागृह येथे करण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटक मा.आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा क्षेत्र, प्रमुख पाहुणे म्हणुन श्री संजय पिंपळशेंडे,सभापती पं. स.वणी, सौ मंगलाताई पावडे जि. प.सदस्य, बंडू चांदेकर जि.प.सदस्य,
श्याम धनमने तहसीलदार वणी,व सुशांत माने तालुका कृषी अधिकारी वणी हे उपस्थित होते.यावेळी नवनाथ कोळपकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ व श्री जगन राठोड उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा यांनी रानभाजी महोत्सवास भेट दिली.
सोशल डीस्टन्सिंग च्या सर्व नियमांचे पालन करून *रानभाजी महोत्सव* प्रदर्शन व विक्री आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये केसुर्ली, घोन्सा, मजरा,ढाकोरी, निळापूर,शेलु (खु),मंदर, कोरम्बी, रासा, उमरी,बाबापूर,गणेशपूर, वणी येथील शेतकरी व उमेद प्रकल्पातील महिला बचत गटांच्या सक्रिय सहभाग घेतला होता. महोत्सवामध्ये कर्टोली,शेवगा फुले,रान तोंडारे, बांबू कोंब,भुईनिंब, अळू, गोपीन, कुंजीर, तरोटा, केणा, घानभाजी, आघाडा,कोंबडा,वाघाटी,अंबाडी,गोपा,राजगिरा,मोठा माठ, कपाळफोळी, घोड, फासवेल, पाथरी, कवठ,चिवड, काठेमाट, उंबर,गुळवेल,खासभाजी,कुळ्याची शेंग, चिंचवट इत्यादी रानभाज्या व रानफळे चे प्रदर्शन भरविण्यात आले होते व त्याची विक्री महोत्सवामध्ये करण्यात आली. महोत्सवामध्ये विविध रानभाजी व रानफळे चे ओळख, वैशिष्ट्ये, औषधी गुणधर्म इत्यादी सचित्र माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.
रानभाजी महोत्सव कार्यक्रम यशस्वितेकरिता तालुका कृषी अधिकारी वणी श्री सुशांत माने यांच्या मार्गदर्शनामध्ये श्री पवन कावरे (मंडळ कृषी अधिकारी कायर), कु. समिक्षा वानखडे कृषी अधिकारी, श्री धम्मपाल बन्सोड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मित्र यांनी परिश्रम घेतले.

Previous articleभंडारा जिल्ह्यात अति वृष्टिमुळे नद्या फुगल्या,मार्ग बंद,वाहतूक खोळंबली! — नागरिक गावाला जाणार कसे?
Next articleघनसावंगी येथे रानभाज्या महोत्सव संपन्न