भंडारा जिल्ह्यात अति वृष्टिमुळे नद्या फुगल्या,मार्ग बंद,वाहतूक खोळंबली! — नागरिक गावाला जाणार कसे?

0
284

संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
काल रात्रोचे २ वाजता पासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नद्या फुगल्या असून बऱ्याच ठिकाणचे मार्ग बंद झाले आहेत व वाहतूक खोळंबली असल्याचे सर्वत्र चित्र आहे.
मौजा लावरी ते सेंदुरवाफा या मार्गातंर्गत दोन्ही गा्वच्या मध्यभागी नदी असून,ही नदी पुरामुळे फुगली आहे.पुलावरून नदीचे पाणी जात असल्याची सदृश्य स्थिती आहे.यामुळे मौजा लवारी,उमरी,परसोडी,या गावातील नागरिकांचा जाण्यायेण्याच्या मार्ग बंद झाला आहे.
गावाला जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे,नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.सदर गावच्या नागरिकांना १५ ते २० किलोमीटर दूर अंतरावरून आपल्या गावी जावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र,पुरामुळे अडकलेले नागरिक राहणार कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे…