राज्यभरात युवक कॉंग्रेस करणार २० लाख कोटींचा पर्दाफाश “प्रदेशाध्यक्ष तांबे ह्यांच्या नेतृत्वात १० ते १४ ऑगष्ट दरम्यान आंदोलन प्रवक्ते कपिल ढोके ह्यांची माहीती.

128

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

करोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळे फार मोठे आर्थिक संकट देशावर कोसळले आहे. या संकटात सर्वच आघाड्यांवर आर्थिक घडी विस्कटली आहे. या संकटा तून सावरण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले होते. ह्या पॅकेजचा पर्दाफाश करण्याचा निश्चय महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस ने केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनात १० ते १४ अॉगष्ट दरम्यान राज्यभरात हे पर्दाफाश आंदोलन होणार आहे. अशी माहिती युवक कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी दिली आहे.

लॉकडाऊन काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले होते. गेल्या तीन महिन्यांत त्याचा प्रत्यक्ष किती लाभ झाला, याची पाहणी करण्यासाठी आणि केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस’ ने आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे ह्यांच्या मार्गदर्शनात १० ते १४ ऑगस्ट या काळात राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिली.

युवक काँग्रेसचं आंदोलन अनोख्या पद्धतीने केलं जाणार आहे. आंदोलनात दररोज वेगवेगळ्या घटकांतील लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे याचा लाभ मिळाला का, अशी चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर यातून संकलित झालेली माहिती, प्रतिक्रिया जाहीर करून ‘कहा गये वो २० लाख करोड?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारण्यात येणार आहे.
कपिल ढोके यांनी या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी १२ मे रोजी घोषणा करून हे २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पत्रकार परिषदा घेऊन आकडेवारीसह योजना जाहीर केल्या होत्या. याला आता तीन महिने झाले असून जाहीर केलेले हे पॅकेज कोठे गेले, त्याचा खरच लाभ मिळाला का?, हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. त्यामुळेच याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन छेडण्यात येत आहे, असे तांबे यांनी नमूद केले.
१० ते १४ ऑगस्ट या काळात दररोज वेगळ्या घटकातील लोकांना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भेटणार आहेत. सुरवात शेतकऱ्यांपासून होईल. १० तारखेला राज्यभर शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना या २० लाख कोटींचा काही फायदा झाला का, हे विचारले जाईल. त्यांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयात फोन करून आणि पत्र पाठवून याबद्दल विचारणा केली जाणार आहे. दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मध्ये सवलत मिळाली का? नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? यांची विचारणा केली जाणार आहे, असे ढोके यांनी सांगितले.