जेसीआय अकोट चे पेंटिंग पोहचले जपान पर्यंत

113

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

जेसीआय अकोट ही व्यक्तिमत्व विकास संघटना दरवर्षी शहरात विविध उपक्रम आयोजित करत असते.या वर्षी कोरोना या विश्वव्यापी आजारामुळे सर्व काही ऑनलाईन उपक्रम चालू आहे.त्यात जेसीआय आकोट या संस्थेतर्फे अनेक आत्मविश्वास वाढविणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम राबविले आहेत.
एवढ्यावरच न थांबता आंतरराष्ट्रीय पातळीवरील एपीसीसी ऑनलाइन इंटरनॅशनल ओमियारी आर्ट स्पर्धेत जेसीआय अकोट या संस्थेतर्फे जेसीलेट युग पवन ठाकूर वय १२ वर्ष याने सहभाग घेतला.त्याची पेंटिंग ही एपीसीसी एशिया स्पेशिपिक चिल्ड्रेन कॉन्फरन्स च्या ऑफीशियली वेबसाईड वर प्रकाशीत करण्यात आली आहे.लहान पणा पासुनच मुला मध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांना वेगवेगळ्या देशाच्या संस्कृती बद्दल आदर निर्माण व्हावा या हेतूने दरवर्षी ही कॉन्फरन्स आशिया खंडातील देशामधील जेसीलेट मुला मुलीसाठी घेण्यात येते.त्यात प्रत्यक्ष मुलेही एकमेकांच्या देशात जाऊन तेथील संस्कृतीची ओळख करून घेतात.पंरतु यावर्षी कोरोना आजारामुळे ही कॉन्फरन्स ऑनलाईन घेण्यात आली त्यात जेसीआय अकोटच्या जेसीलेट युग पवन ठाकूर यांनी आपली पेन्डीग पाठवून व त्या पेन्डीग मधून कोणता समाज उपयोगी संदेश देता येईल हे लिहून स्पर्धेत जेसीआय अकोट चे प्रतिनिधित्व केले.त्यांच्या या प्रयत्नामुळे जेसीआय अकोट चे सर्व सदस्य व शहरातील जनमानसात त्यांच्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.यांचे सर्व श्रेय संस्थेला व प्रयत्न करणाऱ्या जेसीआय च्या सर्व पदधिकाऱ्याला देत आहे.अशी माहिती जेसीआय अकोटचे प्रसिद्धी प्रमुख अनुप गव्हाणे यांनी दिली.