गडचिरोली जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त तर नवीन 13 कोरोना बाधित

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली: जिल्ह्यात आज वडसा आंबेडकर नगर येथील 4, गडचिरोलीतील 1 असे मिळून 5 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज आज देण्यात आला. तर नव्याने 13 जण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये पुणे येथून प्रवास केलेले सीआरपीएफचे 6 जवान, वडसा येथील एसआरपीएफ मधील 1 जण तसेच सीआरपीएफचा गुरगाव या ठिकाणी 1 जण, गडचिरोली पोलीस दलातील 1 जण असे 9 जण सुरक्षा दलातील जवान कोरोना बाधित आढळून आले. आहेरी येथील कोरोना बाधितच्या संपर्कातील मात्र विलगीकरण ठेवलेले 2 तर गडचिरोली व सिरोंचा येथील प्रत्येकी एकेक जण कोरोना बाधित आढळून आले.

यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 159 झाली. आत्तापर्यंत 565 जणांनी यशस्वीरीत्या कोरोना वर मात केली आहे. तर आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 725 झाली.