Home गडचिरोली अहेरी राजनगरीला मिळणार आदर्श मोक्षधाम माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम...

अहेरी राजनगरीला मिळणार आदर्श मोक्षधाम माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांनी दिली ३एकर जागा दान,१कोटींची शासकीय निधी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

160

 

गुड्डीगुडम ग्रामीण प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : अहेरी शहर व परिसरात एकही स्मशानभूमी (मोक्षधाम) नाही. अहेरी शहर व परिसरातील कोणाचा मृत्यू झाला तर ऊन, पाऊस, थंडीत त्यांच्यावर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत होते. अनेकदा पावसाळ्यात तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणेही कठीण जात होते, अहेरी राजनगरी लगत चिंचगुंडी गावाजवळील प्राणहिता नदीकाठावर एक सुंदर, प्रशस्त आणि सर्व सोयीसुविधाने सज्ज असे आदर्श मोक्षधाम (स्मशानभूमी) व्हावे ही सर्व अहेरीकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची रास्त मागणी होती, परंतु दुर्दैवाने ह्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी ह्याकडे कधीही लक्ष दिले नाही.
राजे अम्ब्रिशराव महाराज हे पालकमंत्री असतांना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहेरी शहर व परिसरासाठी एक आदर्श मोक्षधाम अत्यावश्यक आहे व त्यासाठी शासकीय निधी व जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याकडे केली होती, त्यांनीही तत्काळ ह्यासाठी होकार दिला व लगेच १ कोटी रुपयांची निधी देण्याचे त्यावेळी मान्य केले होते. समोर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ती निधी त्यांनी उपलब्ध करुन दिली.
जागेचा प्रश्न जेंव्हा निर्माण झाला त्यावर सुदैवाने त्या नदीकाठावर राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या मालकीची २५ एकर जागा होती, मोक्षधामच्या गरजेनुसार स्वमालकीची ३ एकर जागेसाठी राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी लगेच दानपत्र लिहून दिले. ह्यानंतरच अहेरी लगतच्या चिंचगुंडी प्राणहिता नदिघाटावर १ वर्षपूर्वी आदर्श मोक्षधामाला सुरुवात झाला.
त्या सुंदर , प्रशस्त व सर्व सोयीसुविधा असलेल्या मोक्षधामाची काम पूर्ण झाले असून अहेरी, आलापली, नागेपली, चिंचगुंडी, वांगेपली, कोतुर, गडअहेरी,चेरपली सह परिसरातील अनेक गावांना ह्या मोक्षधामाचा लाभ होणार आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे तसेच राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांची आभार मानले जात आहे

Previous articleबोथिया पालोरा येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहाने साजरा
Next articleक्रांतीदिनी आप चे कार्यकर्ते जेलबंद! संपूर्ण वीजबिल माफ व्हावे यासाठी ऊर्जामंत्र्यांच्या घराला घेराव.