बोथिया पालोरा येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहाने साजरा

116

 पूजा उईके रामटेक तालुका प्रतिनिधी दखल न्युज

भारत बोथिया पालोरा: रामटेक तालुक्यातील बोथिया पालोरा येथे आज 9 ऑगस्ट 2020 रविवारला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमाला गोंडवानाचे अध्यक्ष वासुदेव टेकाम आणि गोंडवानाचे सदस्य हरीशजी उईके यांनी उपस्थिती दाखविली. वासुदेव टेकाम आणि हरीश उईके यांनी गैरा महादेव, महावीर बिरसा मुंडा, आणि राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच आजची परिस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी बोथियातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे आणि कोविड -19 चे नियम पाळून साजरा केले.