चिमूरच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष ना अद्यापही पक्षाने शिष्टाचार शिकविले नाही काय ? .. निलम राचलवार राजशिष्टाचाराचा भंग केल्याने केला निषेध

108

 

प्रतिनिधी/शुभम पारखी

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी ९ आगस्ट क्रांती दिन निमित्त शहिदाना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केल्यानंतर परत येत असताना नगर परिषद चिमूर मध्ये गेले असता त्या ठिकाणी नगराध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित असताना मात्र त्यांनी शिष्टाचारचा भंग केल्याने त्या कृत्याचा निषेध भाजपचे जेष्ठ नेते निलम राचलवार यांनी करीत त्यांना त्यांच्या पक्षाने शिष्टाचार शिकविला नाही काय ? असा प्रश्न उपस्थित केला .
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी नगर परिषद मध्ये भेट दिली असता त्या ठिकाणी नगराध्यक्ष गोपाल झाडे उपाध्यक्ष तुषार शिंदे व नगरसेवक उमेश हिंगे हे सभागृहात उपस्थित असताना त्यांनी साधे उभे न होता एक शब्द बोलले नाही व सन्मानजनक शिष्टाचार केले नाही त्यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी त्यांची कानऊखाडणी केली
सत्ता कोणाचीही असो लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्या सभागृहात येतो शिष्टाचार होणे आवश्यक असताना त्यांनी शिष्टाचाराचा भंग केल्याने त्या कृत्याचा निषेध भाजपचे जेष्ठ माननीय नेते निलम राचलवार यांनी करीत त्यांना त्यांच्या पक्षाने राज शिष्टाचार शिकविला नाही काय असा प्रश्न उपस्थित केला .