जिल्ह्याच्या विकासाकरिता आदिवासी बांधवानी एकत्र यावे आमदार डॉ देवरावजी होळी जागतिक आदिवासी दिनानिमित्य आदिवासी क्रांतिकारक शहीद स्मारक व महापुरुषाना अभिवादन

0
93

 

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून त्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही करिता आपसी मतभेद विसरून सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र यावे .असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शहीद स्मारक व महापुरुषांना अभिवादन आदरांजली अर्पण करताना केले
चामोर्शी येथील बाजार चौकातील शहीद स्मारकाला आदरांजली वाहून सोनापूर येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले त्यानंतर गडचिरोली येथील त्रिमूर्ती चौकातील शहीद स्मारकाला वंदन केले
याप्रसंगी गडचिरोली येथे भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे,प्रमोदजी पिपरे, चामोर्शी व सोनापुर येथे भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा,अरुण कुनघाडकर ,माजी उपसरपंच, पिपलदास सोयाम, नारायण कंनाके, पुंजाराम मडावी, छत्रपती सातपुते, रघुनाथ कोडापे, आशिष चलाख, रामदास मडावी, प्रशांत टेकाम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते