गुड्डीगुडम येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा… जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण

152

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम आदिवासी समुदायाचे आराध्य दैवत सल्ला गांगरा च्या पुतळा तसेच आदिवासी समाजात जन्म घेऊन स्वातंत्र्य चळवळी साठी संघर्ष केलेले स्वातंत्रवीर शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके आणि भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती या महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा केलेत.संपूर्ण जगात आदिवासी दिन म्हणून 9 आगष्ट रोजी साजरा करतात.
सदर जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजचे एकत्रीकरनाचे केंद्र बिंदू गोठूल भवन परिसर आणि ग्राम पंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि वृक्षांची संगोपन करण्याचा संकल्प केला.
कोविड 19 चे नियम लक्षात घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. या वेळी माजी सरपंच श्री महेश मडावी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संदिप सिडाम, पेसा कोष समिती चे अध्यक्ष श्री रमेश कोरेत, पूजक श्रीनिवास मडावी, माजी उपसरपंच श्री समय्या पेंदाम, माजी ग्रा.प.सदस्य रवींद्र मडावी, सामाजिक कार्यकर्ते श्री नारायण आत्राम, अनिल गावडे, राकेश मडावी, निलेश पोरतेट, श्रीकांत पेंदाम, चंदू कोडापे व युवक-युवती गावातील महिला पुरुष उपस्थित होते.