जनतेचे विज बिल माफ करा नाहीतर मंञ्याचे, आमदारांचे घराबाहेर निघणे बंद करू — आम आदमी पार्टी

0
150

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

चंद्रपूर दि 9 ऑगस्ट-
अव्वाच्या सव्वा वीज बिलामुळे मेटाकुटीला आलेल्या या वीज ग्राहकांना राज्य सरकारकडून कोरोना काळातील विज बिलांची माफी देण्यात आली नाही. अनेकांचा रोजगार हिरावला, व्यवसाय बंद आहेत. मोलमजुरी नाही अशा परिस्थितीत वीज ग्राहकांकडे भरण्यासाठी पैसेही नाही देयके अदा केली नाही म्हणून महावितरण कडून वीज पुरवठा खंडित केला तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते स्वतः त्यांचा वीज पुरवठा सुरू करतील अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिली. वीज वापरानुसार विज ग्राहकांना वीज बिलात सवलत द्यावी. दिल्लीतील केजरीवाल सरकारने 200 युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना बिलात पूर्णपणे माफी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये विज माफी द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. मात्र राज्यातील जनतेच्या हिताची भाषा करणारे महाविकास आघाडी सरकारने यावर निर्णय घेतला नाही.लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या कर्माचाऱ्यांना घरोघरी जाऊन वीज मीटर रीडिंग घेता आलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपन्यांकडून वीज ग्राहकांना जी वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ती अवाच्या सवा आली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये मोठ्या असंतोषाचे वातावरण आहे. या संदर्भात आम आदमी पक्षाने कोरोना काळातही राज्यभर आंदोलने केली आहेत.नागरिकांना आलेल्या अवास्तव वीजबिलांकडे आंदोलनं करून सरकारचे
लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे . मात्र जनतेबाबत उदासीन असलेल्या या सावकारी सरकारने अजूनही वीज ग्राहकांना दिलासा दिला नाही.
त्यातच याच मागणीसाठी सत्तेत असलेल्या पक्षाने आंदोलन करणे सुरू केले आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर पुन्हा एकदा कुंभकर्णी झोपेचे नाटक करीत असलेल्या सरकारला तसेच नागरीकाच्या मतावर निवडून आलेल्या आमदाराना सत्तेत असुन विरोधी पक्ष असल्याचे सोंग करणाऱ्या नेत्यांना जागे करण्यासाठी आज विरोधी पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार व 200 यूनिट मोफत चे आश्वासन देऊन निवडून येऊन जनतेचा विश्वास घात करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरा वर आंदोलन करन्यात आले आहे. सात दिवसात वीज बिलाच्या संबंधित मागण्या पूर्ण केल्या नाही तर मंत्री तसेच लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यानी दिला आहे.
यावेळी सुनील मुसळे जिल्हाध्यक्ष,संस्थापक सदस्य माझी जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, अॅड. राजेश विराणी महानगर अध्यक्ष, कोषाध्यक्ष भिवराज सोनी,महानगर संगठक प्रशांत येरने ,सचिव राजू कूड़े,शंकर धुमाले, सूर्यकांत चंदेकर, बलराम केसकर, रवि कुप्पलवार, यांना अटक करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे,महानगर अध्यक्ष ऍड. राजेश वीराणी,कोषाध्यक्ष भिवराज सोनी, परमजीत सिंह झगडे जिल्हा संघटनमंत्री, संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, भिवराज सोनी कोषाध्यक्ष ,सुनील भोयर महानगर उपाध्यक्ष , प्रशांत येरने संघटनमंञी महानगर, राजेश चेडगुलवार सोशल मीडिया प्रमुख, विधि सल्लागार ऍड.किशोर पुसलवार, राजू कुडे महानगर सचिव, बलराम केशकर बल्लारपुर ,रवी पुप्पलवार, अजय डुकरे , सूर्यकांत चांदेकर, सिकंदर सागोरे , संदिप बिसेन , पंकज रत्नपारखी, भगत सींग आज़ाद, कमलेश देवईकर, नंदकिशोर सिन्हा,अभय उर्फ दादुराम यादव, संदीप बिसेन, दिलीप तेलंग, प्रबुद्ध दहेकर, नन्दकिशोर सिन्हा,इत्यादि अनेक आम आदमी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आप चा राजेश चेडगूलवार
सोशल मीडिया प्रमुख,चंद्रपूर जिल्हा महानगर यांनी कळविले आहे.