शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी शिवसेनेने नोंदवला कर्नाटक सरकारचा निषेध

106

 

बिंबिसार शहारे
दखल न्युज भारत

गोंदिया,दि.09/08/2020:
कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते, याचं आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आले आहे. बेळगाल जिल्ह्यातील मनगुत्ती गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा महाराष्ट्र सरकारनेही निषेध नोंदवला असून गोंदियातील यादव चौकात गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. कर्नाटकमधील भाजप सरकारने शिवाजी महाराजांचा हटविलेल्या पुतळ्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेमुळे मनगुत्ती गावात तणाव निर्माण झाला आहे. आत्ता महाराष्ट्रातही या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी निषेध नोंदवायाला सुरवात केली आहे. शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, समन्वयक पंकज यादव, उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे, संघटक सुनिल लांजेवार, उपजिल्हा संघटक अशोक अरखेल, विधानसभा संघठक दिलीप गुप्ता, शहर प्रमुख गुड्डू ऊके, शहर संघटक विनीत मोहिते, उपशहर प्रमुख जय भोयर, अक्षय केवट, कान्हा चौधरी, राजू डहाके, सुरेश रणदिवे, संदीप गिरिपुंजे, कान्हा यादवसह 100 च्या जवळपास शिवसैनिक उपस्थित होते.