शेतातिल बांधावर  निलगिरी , चंदनाच्या झाडाची  रोप लावुन हरितक्रांती दिन साजरा

 

धानोरा/भाविकदास करमनकर
दिनांक ७आँगष्ट हा दिवस भारतिय कृषि क्षेत्रात अतिशय  महत्त्वाचा मानल्या जाते.कारण या दिवसी भारतीय हरित क्रांतीचे जनक श्री.एम.एच.स्वामिनाथन यांचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्यात येते.भारतिय कृषि क्षेत्रातील कायापालट करण्यात त्याचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.याच दिवसाचे महत्व लक्षात घेऊन  शेतावर वृक्षाचि लागवड करण्यात आले.                               ०८आँगष्ट हा दिवस उद्योग विद्याशाञ दिवस  म्हणून संपुर्ण देशात साजरा केला जातो.याच दिवसाचे औचित्य साधून  चामोर्शी तालुक्यातील सावरहेटी गावातील श्रि.आनंदराव लोंढे यांच्या शेतावर निलगिरीची १०००झाडे व चंदनाची १२झाडाची लागवट मारोतराव वादाफळे  कृषि विद्यालय यवतमाळ  येथिल विद्यार्थी हिमानी देवाळे हीने  केले . पर्यावरणच्या हीताच्या दृष्टीने    अतिशय महत्त्वाचे एक पाऊल    पुढे टाकले. स्वामिनाथन यांच्या  जन्म दिवसा निमित्ताने  हरित क्रांती  या बदल माहीति देवून निलगिरी च्या झाडाचे औषध  साठि वापर केले जाते.त्याचे गुणधर्म याची माहीती दिली.यावेळी मार्गदर्शन करन्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले.