शिक्षकी पेशा पिढी घडविणारा पवित्र पेशा होय ! ‌ ‌ तात्या भागवत

23

 

चिपळूण : शिक्षक हा पिढी घडविणारा शिल्पकार असून , शिक्षका सारखा पवित्र पेशा नाही आणि हे काम जीवनभर करण्याचे भाग्य मला लाभले यांचा आनंद आणि समाधान आहे असे उद्गगार जुन्या पिढीतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व, पंचक्रोशीतील आदरणीय शिक्षक मुकुंद गोविंद तथा तात्या भागवत (८८) यांनी काढले. सावर्डे येथील नामवंत शारदा संगीत साहित्य कला क्रीडा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त केले.‌ प्रमुख पाहुणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांच्या हस्ते मानपत्र व समाजसेवक, शिल्पकार प्रकाश तथा बाप्पादा राजेशिर्के यांच्या वतीने शाल, श्रीफळ देवून शैक्षणिक जीवन कार्याबद्दल तात्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी विश्वनाथ पंडित विचार व्यक्त करताना म्हणाले ज्या पायांवर मस्तक ठेवावे असे पाय या व्यवहारी जगात फार दुर्मिळ झालेत ही खंत वाटत असली तरीही गुरूजींच्या रूपाने जेव्हा क्वचितच समाजात समाजासाठी, आपल्या ध्येयासाठी, निरपेक्ष वृत्तीने जीवनभर चालणारी पाऊले आढळतात तेव्हा मस्तक आपोआप नतमस्तक होते. पूर्वीच्या काळी गुरूजी या नावाचा समाजात असलेला आदरयुक्त दरारा, मिळणारा मानसन्मान उपस्थितांना सांगून बाप्पादा राजेशिर्के यांनी जुन्या सोनेरी दिवसांची आठवण करून दिली.
शिक्षक हा प्रत्येक पिढीच्या आदर्शत्वासाठी राजपथ निर्माण करणारा युगपुरुष म्हटलं तर वावगं होणार नाही, आज थोडेफार दुर्मिळ झाले असले तरी ऋषितुल्य भागवत गुरुजी आजही वयाच्या ८८ व्या वर्षी दिपस्तंभा सारखे उत्साहाने कार्यरत आहेत. मैलोनमैल डोंगर, द-या पायी चालत एका निष्ठेने, मुलांना शिक्षण मिळावं ती शिक्षीत, मोठी व्हावीत याच भावनेने त्यांनी निगर्वीपणे आपलं सारं जीवन शिक्षण क्षेत्रात वाहून घेतले असे च़द्रकांत सावर्डेकर गुरूजींनी तात्या भागवत गुरूजींच्या कार्याचा संक्षीप्त आढावा घेतला. सर्वश्री प्रकाश राजेशिर्के, हेमंत तांबे, गुरुजी, चंद्रकांत सावर्डेकर, आशिष शेंबेकर, चिखलकर आधी विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. मयुरेश भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले