दिव्यांगांची हेंडसाळ थांबवा

159

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
दिव्यांग हा समाजाचा एक घटक आहे त्याच्या उत्थानाकरीता शासनाच्या वतीने विविध योजना
राबविल्या जात असतांनाही गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने दिव्यांगांची हेंडसाळ होते आहे
या संदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे लक्ष वेधले आहे गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी बांधवांना जवळपास दोनशे ते तीनशे किलोमीटर चा प्रवास करावा लागतो आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत चिठ्ठी काढण्याची वेळ असते त्यामुळे अतिदुर्गम भागातील दिव्यांगांना ते शक्य होत नाही. प्रमाणपत्र काढण्यासाठी गुरुवार व शुक्रवार या सलग दोन दिवसी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत वेळ देन्यात यावा तसेच त्यांचा काम झाले नाही तर मुक्काम करावा लागतो त्यांची राहण्याची व्यवस्था रुग्णालयात करण्यात यावी दिव्यांगांना उपजीविकेचे साठी कौशल्य उपक्रम, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात यावे रोजगाराच्या साधनांचा पुरवठा करण्यात यावा
महाराष्ट्र शासन परीपत्रानूसार गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक अर्थसंकल्पात दिव्यांगांना ५ टक्के निधी राखून ठेउन तो निधी त्यांच्या कल्यानासाठी खर्च करन्यास यावा मागील दोन वर्षांतील खर्च न झालेला निधी त्यांना देण्यात यावा.गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगांची नोंद करण्यात यावी. १९९५ च्या दिव्यांग व्यक्ती कायघाची अमंलबजावणी करावी त्यांना सरसकट घरकूल योजना सुरू करण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निराधार विधवा घटस्टोटीत व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणारी ५ टक्के निधी चे नियंत्रण करण्यासाठी लवकरात लवकर समीती गठीत करून त्यामध्ये दिव्यांगांना स्थान देण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी प्रल्हाद संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. करीता जिल्हा परिषद मध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रल्हाद संघटनेकडून जिल्हाध्यक्ष मंगेश पोरटे यांनी दिला आहे