//दुख: धाडावे कुणाला//

164

 

दुख: धाडावे कुणाला
मला कोण समजणार ।
जुन्या सुरकुत्या माराच्या
आता कोण पाहणार ।।

सारे देवळात दडलेले
मागण्याची ईच्छा भारी ।
कापी गाईची गर्दन
आता तिला कोण तारी ।।
पै पै पैशासाठी…
भाऊ भावाचा घेतो जीव ।
अंगणातल्या रांगोळीला
कधी येईल हो किव ।।

शिकुनही आज बाई
स्वतः म्हणते अबला ।
दारु पिऊन दादला
रोज वाजवितो तबला ।।

माझ्या देशाच्या मुलींचे
पोटातच जातो जीव ।
मार पोरांच्या हाताचे
बापाचे जाते जीव…।।

✍️कवी – नृपनाथ पी.ढोलणे
📞8888101569

संकलन- ऋषी सहारे
कार्यकारी संपादक