अल्लीटोला येथे जागतिक मुलनिवासी दिन साजरा करण्यात आला

0
117

 

गणेश गावडे
दखल न्युज,ग्रामिण प्रतिनिधी
बेतकाठी

बेतकाठी- दि.9/8/2020 :- गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर कोरची तालूका आणि तालूक्याच्या शेवटी महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सिमेनजिक अल्लीटोला हे गाव 99% मुलनिवासी गोंड जमातींचा एक छोटासा गाव आहे, त्यामुळे आज 9आॅगस्ट जागतिक मुलनिवासी दिन जगातील सर्व मुलनिवासींसाठी गर्वाचा दिवस ह्या दिनाच्या औचित्यावर मौजा अल्लीटोला ह्या छोट्याश्या गावी सर्व आदिवासी बांधव यांनी गोटूल भवनासमोर सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करून जागतिक मुलनिवासी दिन साजरा केला, यावेळी ध्वजारोहक म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मा. सुकलाल हिडामी हे होते, त्याचप्रमाणे गावातील युवावर्ग, गावातील वरिष्ठ पुरूष व महिला, बाल गोपाल उपस्थित होते, यावेळी सुत्रसंचालन जैपाल कमरो यांनी केले व शेवट दिपक काटेंगे यांच्या आभाराने झाले.