मंगरुळपीर शहरात धुर फवारणी करन्याची मागणी

219

 

फुलचंद भगत
मंगरूळपीर-शहरात सध्या मच्छरांचे प्रमाण जास्त वाढल्याने नगरपरिषदेअंतर्गत धुर फवारणी करावी अशी मागणी सय्यद इरफान यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकठिकाणी डबके साचले असुन तणही वाढलेले दिसत आहे.या डबक्यावर आणी विविध प्रकारच्या वाढलेल्या गवतावर मच्छर,चिलटे तथा इतर किटक झाले आहेत.याचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे परिसरात रोगराईचे प्रमाण वाढले असुन लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त वाढले आहे.नगरपरिषदेने शहरात साचलेल्या घाण पान्याच्या डबक्यावर आणी ठिकठिकाणी वाढलेल्या तणावर धुर फवारणी करणे आवश्यक असुन शहरातही या मच्छरांचा नायनाट करन्यासाठी धुर फवारणी करावी जेणेकरुन डेंग्यु,मलेरीयासारखे आजार फैलन्यापासुन बंदोबस्त करावा अशी मागणी सय्यद इरफान यांनी न.प.प्रशासनाकडे केली आहे.शहरात तसाही कोरोनाचे रुग्न झपाट्याने वाढत असल्याने कंटेनमेंट झोनव्यतीरीक्तही सर्वच वार्डामध्ये अशी धुर फवारणी करावी.नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी शहरातील नागरीकांचे आरोग्य अबाधीत राहावे यासाठी धुरफवारणीकडे लक्ष द्यावे अशीही मागणी होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206