Home Breaking News सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी….. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची स्वीकारली आमदार अमोल...

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी….. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची स्वीकारली आमदार अमोल मिटकरी यांनी जबाबदारी

171

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्नील सरकटे

कोरोनाचा संकटकाळ त्यात लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले होते,घरी कमावणारा व्यक्ती एकच आणि कुटुंबात पत्नी व दोन मुली असा संसाराचा गाडा चालवणे अकोट येथील दीपक माहोकार यांना कठीण झाले होते.दीपक यांचे घरापुढेच केशकर्तनालय होते त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा मात्र कोरोनामध्ये दुकानात कुणीही गिऱ्हाईक येत नसल्याने आर्थिक परिस्थिती अभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे दिपकला कठीण झाले व अशातच आर्थिक विवंचनेतुन दीपक माहोकारने यांनी 31 मे. रोजी दोन लहान मुलींना पोरके करीत जगाचा निरोप घेतला आणि कुटुंबासमोर उभं झालं एक मोठं संकट.
अकोट शहरातील शनिवार पुरा भागात अत्यत मोडक्या परिस्थितीत असलेलं घर व डोळ्यापुढे असलेली अंधारलेली वाट एवढच काय ती विरासत सोडून दीपक कायमचे या जगाला सोडून निघून गेले हलाखीची परिस्थिती असल्याने दीपकच्या पत्नी वर्षा माहोकार यांनी मदतीसाठी अनेक प्रयत्न केले मात्र यश आले नाही.दिपक यांनी आत्महत्या केल्यावर त्याचा संसार उघडा पडला,ही बाब कानावर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी संकटात संपडलेल्या या कुटुंबाची २८ जुलै रोजी भेट घेतली, त्यांची परिस्थिती पाहुन मात्र मिटकरी याचे मन हेलावुन गेले. या बहिणीला दिलासा देण्यासाठी तात्काळ शासकीय मदतकरून शासनाच्या विविध योजनेतून या कुटुंबाचा गाडा सुरळीत करण्याचे अभिवचन अमोल मिटकरी यांनी दिले होते. दिले,व आमदार भाऊ अखंडपणे आपल्या सोबतीला आहे.कुटुंबाची व मुलांची काळजी करू नये असा विश्‍वास देत शासन स्तरावर पाठपुरावा केला त्यामुळेच आर्थिक कुटुंब कल्याण अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून शासनाने त्वरित वर्षा महोकार यांना आर्थिक मदतीसाठी सहकार्य केल्याने मदतीचा प्रस्ताव पस केला तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी एक भाऊ म्हणून आपण नेहमी त्या कुटुंबाच्या सोबत असल्याची भावना व्यक्त करीत मुलींच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले .८ ऑगस्ट रोजी कुटूंबाची व मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत रक्षाबंधन म्हणून बहिणीला महाराष्ट्रातील सर्व भावाच्या वतीने आर्थिक मदत दिली शिवाय कुटूंबाच्या शिक्षणासाठी हा भाऊ नेहमीच पाठीशी असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक कृष्णाभाऊ अंधारे,डॉ निलेश वानखडे, सोपान कुटाळे,शिवराज गावंडे, राम म्हैसने,उपस्थित होते.

Previous articleसंवेदनशीलता हरवून निव्वळ व्यापार करणाऱ्या वोक्हार्ट ने रुग्णांचे अतिरिक्त शुल्क परत करावे अन्यथा कारवाई- तुकाराम मुंडे (मनपा आयुक्त)
Next articleमंगरुळपीर शहरात धुर फवारणी करन्याची मागणी