संवेदनशीलता हरवून निव्वळ व्यापार करणाऱ्या वोक्हार्ट ने रुग्णांचे अतिरिक्त शुल्क परत करावे अन्यथा कारवाई- तुकाराम मुंडे (मनपा आयुक्त)

220

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर:९ आँगस्ट २०२०
कोरोना संकटात नागपुर महानगरपालिका ने रुग्णांकरिता शुल्क निश्चित केले होते. मात्र मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांचा आदेश धुडकावून वोक्हार्ट हाँस्पिटल ने रुग्णांकडुन शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क वसुल केल्याचे तपासणीत आढळले आहे. त्यामुळे हे वसुल केलेले अतिरिक्त शुल्क ताबडतोब रुग्णांच्या नातेवाईकांना परत करावे असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काल दिले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांना ८०% बेड चे आरक्षण आणि रुग्णांना शासनाने ठरवून दिलेल्या शुल्क आकारावे अशी सुचना असतांना ही या नियमांचे उल्लंघन करण्याबाबत २४ तासांच्या आत ४ आँगस्ट ला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले होते. परंतु त्या नोटिस कडे वोक्हार्ट हाँस्पिटल ने दुर्लक्ष केले.
त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यांकडे विशेष लक्ष घालत दुसरी नोटीस बजावून रुग्णांकडुन वसुल केलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश वोक्हार्ट ला दिले आहे. जर या आदेशाची अंमलबजावणी ना केल्यास साथीचे रोग प्रतिबंधक कायदा व आणीबाणी व्यवस्थापन व अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यानी आदेश दिले आहेत.
तुकाराम मुंडे पुढे म्हणाले की, कोरोना संक्रमणाचा हा काळ साऱ्यांचीच परिक्षा घेणारा काळ आहे. मागील पाच महिन्यात सारे काही बदलले. कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या या लढाईत अनेकांनी आपले योगदान दिले. हा लढा एकत्रित लढून कोरोनाला हद्दपार करणे, हेच प्रत्येकाचे उदिष्ट असले पाहिजे. पुढील काही काळ कुठलाही नफा होणार नाही, हे लक्षात ठेवून कार्य करायचे आहे. कारण कोरोनाविरुद्धची ही लढाई जगण्यासाठीची लढाई आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांनाही कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोव्हिड आणि नॉन कोव्हिड अशा दोन्ही प्रकारासाठी शासनाने खासगी रुग्णालयांसाठी दरनिश्चिती केली आहे. रुग्णालयांच्या एकूण बेड संख्येपैकी ८० टक्के बेडचे आरक्षण या दरानुसार ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना जर खासगी रुग्णालये नियमांचे उल्लंघन करीत असतील तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. यासाठी आय.ए.एस. अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात तयार करण्यात आलेले पथक प्रत्येक खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवून आहे. हा काळ प्रत्येकासाठीच कठीण आहे. या काळात प्रत्येकाने संवेदनशीलता जपत शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करीत कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडायला हवी. रुग्णालये याला अपवाद नाहीत असेही मुंडे म्हणाले.