सरकारी व खाजगी हॉस्पिटल यांच्याकडून औषधीच्या नावावर होणाऱ्या फसवेगिरी व डॉक्टरांचा निष्काळजीपणा यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने व महानगर पालिकेने समिती स्थापन करावी- राजेंद्र न्हावी

149

जळगाव

जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यासंदर्भात शासनाने व महानगरपालिकेने कठोर पावले उचलायला हवी अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
यात महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी हॉस्पिटल मध्ये किमान दहा ते वीस तरी बेड हे कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात यावे असा आदेश लागू करावा.
खाजगी हॉस्पिटलमध्ये अधिक प्रमाणात बिल वसुली करीत आलेल्या व सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टरांच्या होत असलेल्या हलगर्जीपना, बेजबाबदारपना व बाहेरील दवाई च्या नावाखाली होणाऱ्या मोठ्याप्रमाणावर लुट या संबंधी तक्रारीवर प्रशासनाने लक्ष देऊन या सर्व देखरेखीसाठी समिती स्थापन करावी.