ग्रा पं. खैरी तर्फे कोरोना संकटाशी लढतांना सरपंच मोरेश्वर कापसे यांचे कडुन आवश्यक उपाययोजना

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

खैरी-कामठी /नागपुर: ९ आँगस्ट २०२०
मागील मार्च महिन्यापासूनच नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या खैरी ग्रा पं. येथे कोरोनाशी लढतांना सर्व प्रथम व्यापक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. ग्राम पंचायत खैरी येथे जाणाऱ्या सिमेवरील सर्व रस्त्यावर बैरिगेड लाऊन बंद करण्यात आले होते. तसेच गावात येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद करुन त्यांच्या वाहनाचे निर्जुतुकीकरण करण्यात येत होते. आजही मागील ४ महिन्यापासून हीच उपाययोजना सुरु असुन गावाच्या सीमेवर बॅरिकेट लावण्यात आले व बॅरिकेट जवळ जंतुनाशक औषधीचे गावात येणाऱ्या प्रत्येक गाडीवर फवारणी करण्यात येत अआहे. खैरीगावात जे कोणी सणा निम्मित येणारे नागरिक यांना ते कोणत्या जिल्ह्यातून आले किंवा कोणत्या राज्यातील आहात त्यांची पूर्ण माहिती लावलेल्या बॅरिकेट असलेले ग्राम रक्षक यांच्या कडे लेखी माहिती घेतली जाते.तसेच त्यांच्या वाहनावर जंतू नाशक सॅनिटीझर ची फवारणी केली जाते व कोरोना दक्षतेचा फलक सुद्धा लावण्यात आला आहे त्या नंतर त्यांना प्रवेश दिला जात असतो.या अभिनव उपाययोजना चे श्रेय जाते येथील सरपंच बंडु भाऊ / मोरेश्वर कापसे यांना.
सध्याच्या कोरोना परिस्थितीत खैरी हे गाव आता कोरोना मुक्त झालेले आहे तरी पण सरपंच,सदस्य व आरोग्य समिती कोरोना येऊ नये याची विशेष दक्षता घेत आहे.