सूर्या ग्रुपच्यावतीने पोलीस बांधवांचे रक्षाबंधन

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

संपूर्ण जगात कोरोना महामारी ने थैमान घातला असून या भारत भूमीच्या पुत्रांना वाचवण्यासाठी आपले पोलीस कर्मचारी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंन दिवस या भारत मातेच्या पुत्रांना वाचवण्यासाठी धडपड करत आहेत त्यांचाही एक जीव आहे.त्यांनाही आराम पाहिजे काहीतरी सन्मान पाहिजे त्याचं ही रक्षण झाल पाहिजे म्हणून सूर्या ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सुमितदादा नवलकार यांच्या आदेशानुसार व मायाताई डामरे जिल्हा अध्यक्ष महिला यांनी पुढाकार घेऊन अकोला येथील सिविल लाईन व रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिस बांधवाना राखी बाधुन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थिति अकोला महीला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई डामरे,संघटक गीताताई भेंडे,रेखाताई घोडे,मंदाताई होनाळे,राणीताई रोजतकर,वैष्णवी मालठाणे, शिल्पा गावंडे,भावना चव्हाण,वर्षा वानरेकर,शारदा शेगोकार, प्रमिला वानरेकर,अनिता पानझडे व महिला पदाधिकारी उपस्थित होते.