लाखांदूर येथे खा.मेंढे यांनी साधला जन संवाद

 

प्रतिनिधी-ऋगवेद येवले

लाखांदूर-जि.प.चुनाव लक्षात घेता खा.सुनील मेंढे यांनी लाखांदूर तहसीलच्या कार्यर्कत्यांसोबत अनेक गावांना भेटी देऊन बैठक घेतली.बैठकित जनतेच्या विविध समस्यांवर चर्चा केली
कोदामेंडी गावातील भटक्या विमुक्त जातीच्या समस्यांवर चर्चा केली.खा.मेंढे यांनी समस्या लक्षात घेता, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
खा.मेंढे यांनी सोनी,चप्राड,दिंघोरी,कोदामेंडी गावांची भेट घेतली.यावेळी साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार बाळाभाऊ काशीवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश ब्राम्हणकर,माजी जि.प.अध्यक्ष वसंता ऐंचीलवार जिल्हा महामंत्री नरेश खरकाटे, तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे,जि.प.सदस्य माधुरी हुकरे, नगराध्यक्ष भारती दिवटे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेंद्र ब्राम्हणकर, प्रल्हाद देशमुख,हरीश बगमारे, जितेंद्र ढोरे, सुनील भोवते,हरगोविंद नखाते, रिजवान पठाण, सरपंच मोहनलाल सोनकुसरे, महामंत्री भुषण चित्रीव, युवती प्रमुख वैशाली येवले (हाडगे), नगरसेविका निलम हुमने, संगीता गुरनूले,रीता गोटेफोडे,व शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख, कार्यकर्ते आणी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.