प्रथमवर्ग बिडीओचा प्रभार होता,वर्ग तिनच्या कर्मचाऱ्यांकडे.. — गटविकास अधिकारी चंद्रकांत साबडे गेले होते,पंचायत समिती वाऱ्यावर सोडुन..? — बिडिओच्या भेटणाच्या स्थळाने नागरिक अचंबित..

 

सचिन श्यामकुंवर
तालुका प्रतिनिधी आमगाव

आमगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबडे कोरोना अंतर्गत संचारबंदी काळात पंचायत समितिला वाऱ्यावर सोडुन आपल्या गावी सुट्टीवर गेले होते.गटविकास अधिकारी साबडे सुट्टीवर गेल्याने आमगांव पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याचा दर्जा प्रथमश्रेणी असुन त्या पदाला समकक्ष अधिकार्यालाच प्रभार सोपवायला हवा होता.
पण,सामन्य प्रशासन विभाग व जिल्हा परिषदेतील पंचायत विभागाचा डोलारा एकाच ठिकाणी घुमत असल्यामुळे,पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी,”जे,क्लास थ्री मध्ये येतात,त्यांना प्रभार सोपवण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाने केल्याने,”आत्ता सामान्य प्रशासन विभागातील भोंगड कारभाराच्या बाबतीत आमगांव तालुक्यामध्ये खुल्या स्वरूपात जनमानसात चर्चा सुरु आहे..
पंचायत विस्तार अधिकाऱ्याला दिलेल्या प्रभारामुळे,वर्ग दोन व एक चे अधिकारी असंमजश स्थितीत आहेत.प्रथमश्रेणी व द्वितिय श्रेणी अधिकाऱ्यांना,पदाला अनुसरून बिडिओचा प्रभार न दिल्यामुळे शासकीय व प्रशासकीय नियमांचे उल्लंघन सामान्य प्रशासन विभागाने केले असल्याचे स्पष्ट होते.
पशुवैद्यकीय अधिकारी हे वर्ग एक चे अधिकारी कार्यरत असतांना व बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग दोनचे अधिकारी कार्यरत असतांना,पंचायत समिति मध्ये एका विस्तार अधिकाऱ्याला गटविकास अधिकाऱ्याचा प्रभार का म्हणून सोपविण्यात आला?हा मुद्दा सध्यास्थित आमगाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
परत गटविकास अधिकारी चंद्रकांत साबडे यांना भेटण्याच्या स्थळाची उलट सुलट चर्चा नागरिकांत सुरू असून,त्यांना भेटण्याचे स्थळ सोपे असले,”तरी, ते भेटण्याचे स्थळ अयोग्य असल्यामुळे गोंधळ उडाला आहे.