भटक्या जमाती क प्रवगर्तील ग्रामीण भागातील धनगर समाजासाठी घरकुल योजनाची अंमलबजावणी करण्यात यावी खासदार भवणाताई गवळी यांची मागणी

0
76

 

फुलचंद भगत
मंगरूळपीर- आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या धरतीवर राज्यातील ग्रामीण भागातील धनगर समाजातील लोकांसाठी घरकुल योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुल बांधून देण्यात यावी असा शासनाच्या निर्णयानंतर भटक्या जमाती प्रवर्गातील ग्रामीण भागातील धनगर समाजासाठी घरकुल योजना चे गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी अशी मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे केली आहे.
राज्यातील धनगर समाजाच्या मागणीसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील भटक्या जमातीतील प्रवर्गातील ग्रामीण भागातील धनगर समाजाच्या लोकांसाठी दहा हजार घरकुल अंदाजित खर्च 150 कोटी एवढ्या खर्चात शासनाचे 30. 7 2019 रोजी मान्यता दिली आहे.
पहिल्या टप्प्यात वैयक्तिक लाभार्थी दहा हजार घरकुलास मान्यता दिली आहे.सदर योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स अधिकार सुद्धा प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार सुधा समितीत राहणार आहे
निधी वितरणासाठी प्रथमता प्रशासकीय मान्यतेच्या आदेशा सह शासनास पाठवावे त्यानुसार शासन निधी वितरण करेल ही योजना ग्राम विकास मान्यतेच्या अधीन राहण्यास मान्यता देण्यात येणार आहे तरी या घरकुल योजनेचा लाभ भटक्या जमाती क प्रवर्गातील ग्रामीण भागातील धनगर समाजासाठी दिलासा मिळेल.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206