विठ्ठल मंदिर वॉर्डातील नागरिकांचा समस्याना घेऊन नगर प्रशासनास घेराव

0
236

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी शहरातील कोरोना प्रतिबंधित म्हणून जाहीर केलेल्या विठ्ठल मंदिर वार्डातील बहुसंख्य नागरिक हे अल्पभूधारक शेतकरी व मजूर आहेत त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झालेली आहे वार्डातील नागरिकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारा मोफत राशन अजून पर्यंत मिळालेला नाही त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेला आहे या समस्येला घेऊन वॉर्डातील समस्त नागरिकांनी माननीय मुख्याधिकारी साहेब नगर परिषद आरमोरी यांना सातत्याने विनंती करून सुद्धा समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आला त्यामुळे आज दिनांक ८ ऑगस्ट २०२० ला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सदर समस्या लवकरात लवकर प्रशासनाने सोडवावी अशी मागणी केली आहे.