नरखेड तालुक्यात टीम तरुणाई च्या माध्यमातून सलिल देशमुख यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम चे वाटप

127

 

प्रतिनिधि-मंदार बावनकर
दखल न्युज भारत टीम नागपुर

नागपुर/नरखेड
ग्रामीण भागात कोरोना विषाणु प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच ग्रामीण भागातील लोकांची रोगप्रतिकार शक्ति वाढावी या उद्देश्याने दिनांक 7/8/2020 ला नरखेड तालुक्यातील महेंद्री, नांडणी, मुक्तापुर व खडकी येथे टीम तरुणाई चे माध्यमातून सलील देशमुख (सदस्य, जि. प. नागपूर) यांच्या हस्ते नागरिकांना आर्सेनिक ३० अल्बम वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी तरुणाईचे राज्य समन्वयक सागर दुधाने तसेच सरपंच, उपसरपंच लीलाधर काळे, सचिव खांडे या यांनी पुढाकार घेतला. तसेच श्री अतुल पेठे, किशोर महल्ले, निलेश ढोरे, संजय काळे, अमोल कळसकर यांचे सहकार्य लाभले.