अहेरीत कृषी विभागातर्फे रानभाजी प्रदर्शनी व विक्री महोत्सव, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते उदघाटन…

164

 

प्रतिनिधी / रमेश बामनकर

अहेरी येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषी विभाग,आत्मा व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने बाजारवाडीत रानभाजी प्रदर्शनी व विक्री महोत्सव आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
पंचायत समिती सभापती भास्कर तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी भेट देऊन रानभाजी खरेदी केली. यावेळी गडचिरोली प्रकल्प संचालक आत्मा चे डॉ.संदीप कऱ्हाडे , उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश जगताप, तालुका कृषी अधिकारी दिपक कांबळे, तालुका तंत्रज्ञन व्यवस्थापक अमोल दहागावकर,सचिन पेडपल्लीवार,कृषी अधिकारी सुनील घनवट, कृषी पर्यवेक्षक डोंगरे,वाघमारे,कोवासे, कृषी सहाय्यक,कृषी मित्र, सदन शेतकरी वर्ग तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात उमेदच्या महिला बचतगट ताटीगुडम,अहेरी,मलमपल्ली, पेरिमिली, नवेगाव,शिवणीपाठ, नागेपल्ली,आणि जिमलगटा या गावातील गटांनी रानभाजी प्रदर्शीनि व विक्रीस सहभाग नोंदविला.
बचत गट महिलांनी विविध राणभाजी, कंदमुळे, पालेभाजी 30 ते 40 प्रकारच्या भाज्या विक्रीला ठेवण्यात आल्या.राणभाजी आणि तिचे औषधी गुणधर्म विषद करणाऱ्या ताटीगुडमयेथील वंदना कोडापे यांनी दहा प्रकारचे राणभाज्या आणून सर्वांचे लक्ष वेधले.वस्त्या, धोपा, अळू, कर्टुले,,वेगवेगळ्या झाडाची फुले,अळीबिंची भाजी, सुरण, राणलिंबू,भुईनीम हा मलेरिया, टाईफाईड सारख्या तापावर गुणकारी काढा म्हणून वापरले जाते.अशी इंदाराम येथील महिलांनी माहिती दिली.पचनसंस्था सुरळीत असेल तर माणसाला निरोगी आणि सुंदर आयुष्य जगता येते हे कंदवर्गीय, आणि पालेभाज्यानी जगाला दाखवून दिले आहे.उपलब्ध सत्तर टक्के जंगल भागात आदिम काळापासून उपजीविका करणारा हा आदिवासी समाज सहसा दवाखान्याची पायरी चढत नाही.इथे डायबेटीस बीपीची गोडी खपत नाही.अशी मेडिकल दुकानात अवस्था आहे.अल्पसंतुष्ट भोळ्या दैववादाच्या गर्तेत अडकल्याने शेतीवर उपजीविका होते.हे माहीत नसलेला आदिवासी इथे आहे.ऐहिक सुख काय असते हे माहिती नसल्याने जीवनाचा खराखुरा आनंद घेणारा भूभाग आहे.सुखाची व्याख्या म्हणजे स्वताचे नैसर्गिक जगण्यात धन्यता मानणारा वर्ग म्हणून आज हा तालुका ओळखला जातो.सेंद्रिय शेतमाल, भुईमूग, राणभाजी आणि तांदुळ, मध यांना सरळ विपणन व्यवस्था जुळून आली.तर शेतकरी आपले आयुष्य आर्थिक दृष्ट्या सबळ करू शकतो.हे आज दिसून आले.सुरक्षित अंतर ठेवून गावातील नागरिक प्रदर्शनी बघण्यास मोठया संख्येने सहभागी होऊन खरेदी केली.नागरिकांना रानातील भाज्या, कंदमुळे बघायला मिळाले.राणभाजी शहरात मिळत नसल्याने नागरिकांनी आनंदाने खरेदी केली.सहभाग झालेल्या महिला बचतगटांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे.