मुंग -उडिदवर आलेल्या रोगामुळे होत असलेल्या नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी – निवेदन सादर

0
88

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

सन – 2019-2020 साली मुंगाच्या व उडिदाच्या पिकांवर अतीशय जास्त प्रमाणे मर व इतर प्रकारचे ( बेडक्या रोग ) रोग निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे . सद्यस्थिती मुंगावर मागील जुलै 2020 पासुन रोग आलेला असनु शेतातील पिक खराब करीत आहे . तसेच सद्यपरीस्थिती अशी आहे की या रोगाचा प्रादुर्भाव उडिदा वर सुध्दा होत आहे . त्यामुळे किमान शासनाने मुंगाच्या पीकाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचे सर्व्हे करुन त्वरीत नुकसान भरपाई करुन देण्याची कार्यवाही करावी ही अपेक्षा करतो .
आधीच कोरोना चा प्रादुर्भाव संपुर्ण भारतात सुरुच आहे . शेतकरी हया सर्व आजारांमुळे हैरान व परेशान झालेला आहे.त्यात आता हा मर व इतर प्रकारचे ( बेडक्या रोग ) नविन रोग शेतकऱ्यांना हलावुन टाकले आहे . त्यामुळे शेतकाऱ्यांचे जिवत धोक्यात आलेला असुन त्यांची मोठया प्रमाणात आर्थिक कोंडी निर्माण झालेली आहे . तरी आपण तात्काळ सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन आम्हा शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्यवाही करावी. अशी मागणी रा. यु. कॉं चे राम म्हैसने, शिवराज गावंडे, अनिकेत कुलट, श्रीकांत साबळे, पंकज भिसे, शिवा गीते, पवन सवरकर, जयदीप चराटे, पवन खुमकर, मयुर बरबरे, सागर मार्के,शुभम देशमुख, पवन वनखडे, अनुप थुटे,विठ्ठल फोकमारे, प्रथमेश सोळंके यांच्या सह आदी मंडळी उपस्थित होती.